Nashik Fraud Case : कांदा खरेदी करत व्यापाऱ्याची साडेसात लाख रुपयात फसवणूक; मनमाड बाजार समितीतील प्रकार

Nashik : नाशिकच्या मनमाडमधील एका कांदा व्यापाऱ्याची पाच जणांनी कांदा खरेदी करत तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनमाड बाजार समितीमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेचचांदवडमध्ये एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड बाजार समितीत कांद्याचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून विदर्भ व सोलापूर जिल्ह्यातील कांदा खरेदी केला. खरेदी वेळी व्यापाऱ्याने विकलेल्या मालाचे पैसे मागितले. मात्र रक्कम न देता नंतर देतो असे सांगत या कांदा खरेदी करणारे पाच जण गेले. मात्र बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील रक्कम मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

मनमाड पोलिसात गुन्हा दाखल

दरम्यान कांदा खरेदी करणाऱ्या पाच जणांनी कांदा व्यापारी गणेश प्रभाकर अहिरे याची साडेसात लाख रुपयां पेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर अहिरे यांनी मनमाड पोलिसात फसवणूकीची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात संगनमताने फसवणूक प्रकरणी विविध कलमाद्रवारे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.

Pune Crime News : घरात घुसला, फोन हिसकावला अन्...; पुण्यात गॅस सिलेंडर डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

द्राक्ष उत्पादकांची दोन लाखाची फसवणूक

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षांची काही व्यापाऱ्यांनी बागेची खरेदी केली. प्रत्येक शेतकऱ्याचे ठराविक रकमेनुसार द्राक्षांची खरेदी केली. एकुण दोन लाख रुपयांची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. मात्र अनेक दिवस उलटून ही वारंवार संपर्क करुन देखील खरेदीदारांनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच द्राक्ष उत्पादकांनी वडनेर- भैरव पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोघां विरोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply