
Nashik : मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्यामुळे लोकांना तासनतास थांबावं लागतं, वाहतूक कोंडी होते, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात रोड शो केला होता. या रोड शो साठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते. मुंबई पूर्व उपनगर आणि ठाण्याला जोडणारा लाल बहादूर शास्त्री मार्ग रोड शो साठी बंद ठेवण्यात आला होता. याशिवाय, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सेवाही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे संध्याकाळी कामावरुन घरी निघालेल्या सामान्य नोकरदारांचे प्रचंड हाल झाले होते. याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना रोड शोच्या मुद्दयावरुन कानपिचक्या दिल्या. मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं, शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबाव लागते, वाहतूक कोंडी होते. मोदींनी रोड शो घेतला होता, तो भाग प्रामुख्याने गुजराती आहे. मोदींना रोड शो करायचाच होता, तर मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता. पण मोदींचं लक्ष्य विशिष्ट वर्ग होता. मात्र, त्यामुळे लोकांना त्रास झाला, असे शरद पवार यांनी म्हटले.
|
Pune Traffic Diversion : पुण्यात 'या' रस्त्यावरील वाहतूकीत मोठा बदल; कोणता रस्ता सुरु, कोणता बंद? |
सत्तास्थापनेच्या वेळी ममता बॅनर्जी आम्हाला बाहेरुन पाठिंबा देतील: शरद पवार
ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत नसल्या तरी सत्ता स्थापनेची वेळ आली तर त्या बाहेरून समर्थन करतील. माझा त्यांच्याशी संवाद आहे, असे शरद पवारांनी सांगितले. आज त्या इंडिया आघाडीत नाही मात्र माझे त्यांच्याशी संबंध आहे. माझा स्वतः त्यांच्याशी डायलॉग आहे. ममता बॅनर्जी नक्कीच सहकार्य करतील, असे शरद पवार यांनी सांगितले.
मोदींकडे सांगायला काही उरलं नाही म्हणून विषय भरकटवण्याचा प्रयत्न: शरद पवार
पंतप्रधान मोदी यांनी कल्याणमधील सभेत भाषण करताना काँग्रेस पक्षाने हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे बजेट तयार केल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटले की, मोदींचं हे बोलणं योग्य नाही. बजेट हे कुठल्या जातीधर्माचं नसतं. देशाचे बजेट असते. मोदी बोलतात, ते कधीही होऊ शकत नाही. मोदींचा कॉन्फिडन्स ढासळला आहे. मोदींकडे काही सांगण्यासारखं शिल्लक नाही, त्यामुळे ते विषय भरकटवत आहेत. ते जे बोलत आहेत, त्यापैकी एक टक्कादेखील काही खरं नाही. जातीधर्माचा विचार करून देश चालत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
मोदींना व्हिसा नाकारला होता तेव्हा मी त्यांना इस्रायलला घेऊन गेलो होतो: शरद पवार
पंतप्रधान मोदी मी इतक्या वर्षात काय केलं, असा प्रश्न विचारतात. ते गुजरातचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या राज्यातला शेतीचा कोणताही विषय राहिला तर ते माझ्याकडे यायचे. मी ही गुजरातला जायचो. मी एकदा इस्रायलला जात असताना मला मोदींचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, मला अमेरिकेचा व्हिसा नाकारला आहे. मला तुमच्यासोबत इस्रायलला येण्याची इच्छा आहे, मला घेऊन चला, असे ते म्हणाले. मी त्यांना घेऊन इस्रायलला गेलो. इस्रायलमध्ये शेतीतील प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि इतर गोष्टी मी त्यांना दाखवल्या. एवढं सगळं माहिती असूनही पंतप्रधान मोदी असं का बोलतात त्याचं कारण राजकारण आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

