Nashik : मविआ गेली खड्यात, राहुल गांधी नाशकात आल्यावर काळं फासणार, ठाकरेंचा शिलेदार आक्रमक

+*-

Rahul Gandhi Nashik visit threat : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उप महानगर प्रमुख बाळा दराडे यांनी थेट काँग्रेस नेते राहुल यांना इशारा दिला आहे. राहुल गांधी नाशिकला आले तर काळं फासणार असल्याचा इशारा दराडेंनी दिलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्यामुळे राहुल गांधी अडचणीत आले आहेत, याप्रकरणी त्यांना नाशिक कोर्टात हजर राहावे लागणार आहे.त्याआधी ठाकरेंच्या शिलेदाराने हा इशारा दिला आहे. सावरकर आणि हिंदुत्व हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर काळे फासणार आहे, असा इशारा दराडेंनी दिला आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासून गाडीवर दगडफेक करू, अशा इसारा बाळा दराडे यांनी दिलाय. सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही. महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, सावरकर आणि हिंदुत्व आधी आहे, असे ठाकरेंचे नाशिकमधील शिलेदार दराडे म्हणाले. पुढील काही दिवसांत राहुल गांधी सुनावणीसाठी नाशिक कोर्टात हजर राहणार आहे, त्याआधी दराडे यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील तणाव तीव्र होण्याची शक्यता आहे.

KDMC News : केडीएमसीची नालेसफाई कागदावरच; पावसाळा तोंडावर मात्र नाले कचऱ्याने भरलेले

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकरेंचे नेते बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला. राहुल गांधी यांनी दोनवेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. सावरकरांना माफीवीर म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गंधी यांच्यावर जहरी टीका केली होती. आता आता नाशिकमधील वकील मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी यांना कोर्टाकडून समन्स बजाबला आहे. सुनावणीसाठी राहुल गांधी कोर्टात आले तर ठाकरे शैलीत उत्तर दिले जाणार असा इशारा बाळा दराडे यांनी दिला.

राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर ठाकरे शैलीत उत्तर दिले जाईल. त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू, तोंडाला काळं फासू, असा इशारा दराडे यांनी राहुल गांधींना दिला. महाविकास आघाडी नंतर, मविआ गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व. सावकर यांच्याबद्दल केलेलं कोणतंही वक्तव्य खपवून घेणाप नाही, असंही दराडे म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *