Unseasonal Rain : कांद्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका; नाशिक जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवरील कांदा मातीमोल

Nashik : अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यात शेती पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. दरम्यान मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांद्याला बसला आहे. कारण एकट्या नाशिक जिल्ह्यात तब्बल तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा मातीमोल झाला आहे. याशिवाय फळबागा देखील उध्वस्त झाल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी गेले काही दिवस पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरवातीपासून सुरु झालेला पाऊस अजून देखील थांबलेला नाही. या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झाले. यामध्ये काढणी केलेला व काढणीवर आलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांद्यापाठोपाठ आंबा, डाळिंब, भाजीपाला आणि काही प्रमाणात द्राक्षांचे देखील नुकसान झाले आहे.

Anil Gote : रेस्ट हाऊसमधील कॅश प्रकरण राज्य शासनाकडून दाबण्याचा प्रयत्न; माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप

नाशिक जिल्ह्यात साडेसहा हेक्टरवर पिकांचे नुकसान मे महिन्याच्या सुरवातीपासून सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात एकूण ६ हजार ५०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले असून मुसळधार पावसामुळे तब्बल ३ हजार हेक्टरवरील कांदा मातीमोल गेला आहे. काढणी करून ठेवलेला कांदा शेतातच सोडून गेल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. अर्थात विक्रीसाठी नेण्यासाठी देखील शेतकऱ्याला उसंत मिळाली नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे.

वाफसाचा अंदाज घेऊनच खरिप पेरणीचे आवाहन दरम्यान अवकाळी पाऊस सुरु असताना राज्यात मॉन्सून दाखल झालेला आहे. मॉन्सून दाखल झाल्याने अनेक शेतकरी पेरणीच्या कामाला लागण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा साडे ६ लाख ४४ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचा अंदाज आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ज्या भागात ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाला. त्या भागातील शेतकऱ्यांनी मातीच्या वाफसाचा अंदाज घेऊनच खरिपाच्या पेरणी करावी; असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply