Nashik : अवकाळीचा कहर जीवाशी! नाशिकमधील दोघांचा पावसामुळे मृत्यू, एकाचा विजेमुळे तर..

Nashik : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले आहे. शेतकरी वर्गावर याचा मोठा परिणाम होत असून, नाशिक जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. सिन्नर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात सलग ९व्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून, सिन्नर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिन्नर तालुक्यातील त्रिसुळी भागात वीज पडून वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या १२ वर्षीय मुलगा विकास बर्डे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, गावातून शोक व्यक्त केला जात आहे.

तर दुसऱ्या घटनेत मौजे नलवाडी येथे एका ३५ वर्षीय व्यक्तीला विजेच्या तारेचा शॉक बसला. शॉक लागल्यामुळे रामदास सहाणे हा थेट विहिरीत पडला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ग्रामस्थांच्या उपस्थितीत घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही घटनांमुळे सिन्नर तालुक्यात शोककळा पसरली असून, प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply