Nashik : नाशिकच्या लासलगावमध्ये मालगाडीने धडक दिल्याने घडली मोठी दुर्घटना; अपघातात ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू

Nashik News : नाशिकमधून धक्कादायक बातमी हाती आली आहे. नाशिकच्या लासलगावमध्ये मालगाडीने धडक दिल्याने ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लासलगाव - उगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे कामगारांचा मृत्यूने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,नाशिकच्या लासलगावमध्ये मालगाडीने (टॉवर वॅगेन ट्रेन) धडक दिल्याने ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात लासलगाव - उगाव रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ४ रेल्वे कामगारांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर या अपघाताने स्टेशन परिसरात शोककळा पसरली आहे.

लासलगाव - उगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे कर्मचारी ट्रॅक देखभाल, दुरुस्तीचे काम करत असताना मालगाडीने धडक दिली. या मालगाडीच्या धडकेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चारही रेल्वे कर्मचारी चाळीशीच्या आतील आहे.

या अपघातातील चार मृत रेल्वे कामगारांची नावे देखील समोर आली आहे. या अपघातात संतोष भाऊराव केदारे (38 वर्षे), दिनेश सहादु दराडे वय (35 वर्षे), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे), संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38 वर्षे) या रेल्वे कामगारांचा मृत्यू झाला आहे.

 
दरम्यान, या रेल्वे कामगारांचा अपघात कसा झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या भीषण अपघातानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या भीषण अपघाताची माहिती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मालगाडी अपघातप्रकरणी ट्रेन इन्जार्ज चालकाला पालोसिांनी ताब्यात घेतले आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडून चालकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. नातेवाईकांकडून चालकाला चोप देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply