Narendra Modi : सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान मोदींची पोस्ट; मतदारांना केलं खास आवाहन

Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ८ राज्यांतील एकूण ५८ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर तगडा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना खास आवाहन केलं आहे.

आपल्या अधिकृत X अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये मोदी म्हणतात, "लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदारांना माझं आवाहन आहे की, त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं. निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व असत. तसं तुमचंही वोट महत्वाचं आहे".

Rain Alert : येत्या ४८ तासांत रेमल चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळणार; IMD कडून अलर्ट

"लोकशाही तेव्हाच फुलून दिसते, जेव्हा निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक व्यक्ती सहभागी होऊन मतदान करतो. त्यामुळे माझं माता भगिणी, तरुण तसेच इतर मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं", असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सहाव्या टप्प्यात कोणकोणत्या राज्यात मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यात दिल्लीतील सर्वच १० जागा, उत्तर प्रदेशातील १४, हरियाणातील सर्व १०, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, ओडिशातील ६, झारखंडमधील ४ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर आज मतदान होत आहे.

नवी दिल्लीतील ७ मतदारसंघामध्ये कांटे की टक्कर

उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघ

मनोज तिवारी (भाजप) विरुद्ध कन्हय्या कुमार (काँग्रेस)

चांदणी चौक लोकसभा मतदार संघ

प्रवीण खंडेलवाल (भाजप) विरुद्ध जे पी अग्रवाल (काँग्रेस)

उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघ

योगेंद्र चांदेलिया (भाजप) विरुद्ध उदित राज (काँग्रेस)

पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघ

हर्ष मल्होत्रा (भाजप) विरुद्ध कुलदीप कुमार (आप)

नवी दिल्ली लोकसभा मतदार संघ

बांसुरी स्वराज (भाजप) विरुद्ध सोमनाथ भारती (आप)

पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघ

कमलजित सेहरावत (भाजप) विरुद्ध महाबल मिश्रा (आप)

दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघ

 
 
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply