Narendra Modi : '२२ जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा'; अयोध्येतून PM नरेंद्र मोदींचं आवाहन

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशच्या अयोध्या रेल्वे स्टेशनचं लोकार्पण केलं. तसेच यावेळी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याच लोकार्पण सोहळ्यातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. '२२ जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा', असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना केलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की,'राममय अयोध्या धाममध्ये आज विविध विकास योजनेचा लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमाचा अभिमान वाटत आहेत. आता संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहेत. यामुळे अयोध्यावासीतील लोकांमध्ये उत्साह निर्माण होणं स्वाभाविक आहे'. 

Palghar Bus Accident : हृदयद्रावक! भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी

'4 कोटी गरीबांना मिळालं पक्के घर'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटलं, 'एके काळी अयोध्यामध्ये रामलल्ला एका तंबूत होते. आता त्यांना पक्कं घर मिळालं आहे. फक्त रामलल्ला यांनाच नाहीतर देशातील ४ कोटी गरीबांनाही पक्कं घर मिळालं आहे. आज आम्ही घराघरात पाणी पोहोचवत आहेत. घरात पाणी पोहोचवण्यासाठी पाण्याच्या दोन लाखांहून अधिक टाक्या बसविण्यात आल्या आहेत'.

घराघरात दिवाळी साजरी करा'

राम मंदिरावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले की, ' २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. यासाठी देशातील १४० कोटी लोकांनी २२ जानेवारीला घरात श्रीराम दिवा प्रज्वलित करा आणि दिवाळी साजरी करा'.

'२२ जानेवारीला अयोध्याला येऊ नका'

यावेळी पंतप्रधान मोदींनी २२ जानेवारीला अयोध्या येथे येऊ नका, असं आवाहन केलं. 'प्रत्येकाची इच्छा आहे की, २२ जानेवारीला लोकार्पण सोहळ्याला यावं. पण प्रत्येकाला कार्यक्रमाला येणे शक्य नाही. रामभक्तांना विनंती आहे की, २२ जानेवारीला मंदिरात विधीचा कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या सोयीनुसार राम मंदिरात या. पण २२ जानेवारी कार्यक्रमासाठी येऊ नका, असं आवाहान मोदींनी केलं.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply