Nandurbar Zp News : जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया रखडली; संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन

Nandurbar Zp News : नंदुरबार जिल्हा अंतर्गत बदल्यांचे प्रक्रिया होत नाही. बदल्यांची प्रक्रिया तातडीने सुरू  करण्यात यावी; या मागणीसाठी अवघड क्षेत्र बदली संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

नंदुरबार जिल्हा परिषद  शाळांमधील शिक्षकांची बदलीची प्रक्रिया वारंवार तक्रारी करून देखील होत नसल्याने थेट शिक्षकांनी धरणे आंदोलन करण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यात नुकसान होणार आहे. नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या दुर्गम रांगात वसलेला आहे. त्यामुळे अनेक शिक्षक दुर्गम भागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. मात्र त्या शिक्षकांना  सपाटीकरणाच्या भागात बदली करण्यात यावी आणि सपाटी भागातील शिक्षकांना दुर्गम भागात बदल्या करण्यात यावी. मात्र जिल्हा परिषदेने मोजकेच शिक्षकांच्या बदल्या होत आहे.  

Maratha Reservation : कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी मराठवाड्यात विशेष मोहिमेचे आयोजन; आठही जिल्ह्यात 17 व 18 जानेवारीला कॅम्प लावणार

अनेक वर्षांपासून एकाच शाळेवर 

अनेक वर्षापासून शिक्षक एकच शाळेवर असल्याने त्या शिक्षकांची बदली करण्यात यावी; या मागणीसाठी अवघड क्षेत्र बदली संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बाहेर धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा शिक्षकांच्या वतीने देण्यात आलेला आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply