Nandurbar ZP : नंदुरबार जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपुष्टात; जिल्हा परिषदेसह ६ पंचायत समितीवर प्रशासक राज

Nandurbar ZP : कोरोनानानंतर राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपुष्टात आल्याने प्रशासक बसविण्यात आले आहे. यानंतर आता नंदुरबार जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सहा पंचायत समितीची देखील मुदत आता संपुष्टात आली आहे. यामुळे याठिकाणी देखील आता प्रशासक बसविण्यात आले आहे. हा कालावधी निवडणूक होईपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.

राज्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत कोरोनाच्या कालावधीत संपली आहे. कोरोना असल्यामुळे कोणत्याही निवडणूका होऊ शकल्या नाही. काही स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपण्यास आज तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. दरम्यान आता जानेवारीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Vande Bharat Sleeper : मुंबईत धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन, ट्रायल रनचे व्हिडीओ व्हायरल

नंदुरबार जिल्हा परिषदेतही प्रशासक

नंदुरबार जिल्हा परिषदेसह नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा व नवापूर पंचायत समितींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नंदुरबार जिल्हा परिषद व जिल्ह्याभरातील सहाही पंचायत समितींचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण सहा पंचायत समिती आहेत. जिल्हा परिषदेचे एकूण ५६ गट व एकूण ११२ गण आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात एकूण ५८५ ग्रामपंचायती असून यात एकूण ९४५ गावांचा समावेश

प्रशासक नियुक्तीचे पत्र

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणूका मुदतीत घेणे शक्य नाही म्हणून संबंधीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर नियुक्ती करावी असे पत्रात म्हटले आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 6 पंचायत समितीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी काढले आहे. यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील; तो पर्यंत नंदुरबार जिल्हा परिषदेवर देखील प्रशासक कायम राहणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply