Susari Dam : सुसरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा

Nandurbar : शहादा तालुक्यात आणि सातपुड्याच्या डोंगरांमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी त्यावर असलेल्या धरणांच्या पाणी पातळींमध्ये वाढ झाली आहे. यात सुसरी धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून धरणातून आता पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. मागील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला असून नदी, नाल्यांना पूर आले आहेत. हे पाणी धरणात जात असल्याने धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. यात नंदुरबार तालुक्यातील नवलपुर शिवारात असलेल्या सुसरी प्रकल्प तुडुंब भरला असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे सुसरी नदीला देखील मोठा पूर आला आहे. 

Nashik Rain : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपलं, गोदाकाठावरील अनेक मंदिरांना पुराचा वेढा, धडकी भरवणारा VIDEO

धरणाच्या तीन पैकी दोन वक्र दरवाजे पूर्णतः उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सुसरी नदीला मोठा पूर आला असून नदीच्या काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे  नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात किंवा नदी काठावर जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply