Nandurbar Police : नंदुरबार जिल्ह्यात विदेशी दारू तस्करी; पोलिसांनी कारवाई करत ९ लाखाचा साठा केला जप्त

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात अन्य राज्यातून दारूची तस्करी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यात विदेशी दारूची तस्करी केली जात असताना विसरवाडी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ३६ हजार रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त केली असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील दहिवेलकडून विसरवाडीकडे एका कारमधून दमणसाठी दारू तस्करी करून नेली जात होती. या बाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे एक पथक तयार करून सरपणी नदी पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली. माहितीनुसार संशयित कार थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालकाने पोलिसांवर गाडी चालवून पळण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. या कार्यवाहीत पोलिस उपनिरीक्षक देविदास वडगुले आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर बोरसे किरकोळ जखमी झाले आहेत.

Pune : वडिलांच्या संपत्तीसाठी मुलगा हैवान, जन्मदात्या आईला वृद्धश्रमात अन् बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये धाडलं

मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात

मात्र पुढे जाऊन अवजड वाहनांमुळे कार अडकल्याने पोलिसांनी कार अडवून तपासणी केली. यात दमणमध्ये विक्रीसाठी असलेली विदेशी दारूच्या पेट्या ज्याची किंमत ९ लाख ३६ रुपये आणि चार बनावट नंबर प्लेट्स जप्त केल्या आहेत. तसेच हेमंतकुमार धनसुखभाई राठोड (वलसाड, गुजरात) आणि जैनील रमेश पटेल (दमण) या दोन तस्करांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांना टोळी अटक

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्ड परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांवर चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भिवापूर वार्डातील महिलांकडे गांजा सदृश्य वनस्पती बाळगून विक्री होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत ९ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवलेली वाळलेली हिरव्या रंगाची पाने, फुले, बिया असलेली गांजासदृश्य वनस्पती जप्त करण्यात आली. या वनस्पतीचे एकूण वजन १ किलो १५७.४ ग्रॅम असून गांजा विक्रीप्रकरणी मुस्कान ऊर्फ सेहा ऊर्फ भारती खैरे, पुष्पा बानलवार या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *