Nandurbar Police : दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; निवडणुकीच्या काळात पोलिसांची कारवाई

Nandurbar Police : लोकसभा निवडणुकीच्या काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा अमली पदार्थ आणि त्यासाठी वापरले जाणारी १ कोटी ३७ लाख रुपयांची वाहने जप्त केली आहे. या दरम्यान ४ हजाराहून अधिक जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.  

नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश  राज्यांच्या सीमा भागावर आहे. या कारणाने गुन्हेगारांवर वचक ठेवणे. यासोबतच दारू, गांजा आणि अवैद्य शस्त्र यासोबतच महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. या अनुषंगाने पोलिसांनी नजर ठेवण्यासाठी निवडणुकीच्या काळात सीमावरती भागांमध्ये २६ तपासणी नाके तयार करण्यात आले होते. आचारसंहितेच्या काळात तपासणी नाक्यांवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी करत कारवाई केली आहे. 

कारवाई करत गुन्हे दाखल 

लोकसभा निवडणुकीच्या  काळात पोलीस दलाने कारवाई करत तब्बल १ कोटींची दारू, ७५ लाखांचा गुटखा, यासोबतच ६० हजारांचा गांजा आणि सव्वा कोटींची एकूण 64 वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत एकूण ४ हजार जणांवर गुन्हा दाखल निवडणुकीचा काळात करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply