Nandurbar News : नंदुरबारमध्ये काँग्रेसला धक्का; जिल्हा परिषद सभापती रतन पाडवींचा अजित पवार गटात प्रवेश

 

Nandurbar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर के सी पाडवी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नंदुरबार जिल्हा परिषदेचे सभापती रतन पाडवी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी अजित पवार  गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात के सी पाडवी यांचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या रतन पाडवी यांनी पक्षाला रामराम ठोकला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात ते सामील झाले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रतन पाडवी यांच्यासोबतच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही ही राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.

Palghar Accident : क्रिकेट खेळाडूंच्या कारला भीषण अपघातात; दोघांचा मृत्यू, ४ जण जखमी

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून जाहीर सभा, नेत्यांचे दौरे वाढू लागले आहेत. अशातच नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *