Nandurbar : नदीवर पुल नसल्याने पुरातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास; पर्यायी मार्ग नसल्याची अडचण

Nandurbar : तळोदा तालुक्यातील बोरवाण गावात नदीला पूल नसल्याने येथील नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या गावाला पावसाळ्यात पर्यायी रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी हि समस्या दरवर्षीच निर्माण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर बोरवान गावाजवळून गेलेल्या नदीवर अदयाप पूल झालेला नाही. यामुळे पुरातून मार्ग काढावा लागत असतो. परिणामी आरोग्याच्या मोठ्या समस्या देखील निर्माण होत असतात. गरोदर महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. या जीवघेण्या प्रवासामुळे पुराच्या पाण्यातून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागू शकतो. मात्र या गावांना जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून आदिवासी बांधव प्रवास करताना पाहायला मिळत आहेत.  

GST News : GST काऊंसिलच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, रेल्वे सुविधांना करातून सूट

पूल मंजूर, कामाला विलंब 

गावकऱ्यांच्या मागणीनुसार बोरवान नदीवर पूल मंजूर करण्यात आला आहे. पण त्या मंजुरीला अनेक महिने उलटून देखील प्रत्यक्षात पुल बांधणीला सुरुवात न झाल्याने पावसाळ्यात या गावकऱ्यांना आता मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. जर बोरवणीचा नदीला मोठा पूर आला; तर त्या परिसरातील दहा गावांच्या संपर्क तुटत असतो आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या देखील समस्या समोर येत असतात. अनेक महिने उलटून देखील या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यामुळे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले असून गावाची समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा बीरसा आर्मीच्या वतीने देण्यात आलेला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply