Nandurbar News : गुजरातला जाणारा ३ लाख १८ हजाराचा दारूसाठा जप्त; शेतात धाड टाकून पोलिसांची कारवाई

Nandurbar News : महाराष्ट्र राज्यातून गुजरात जाणारा दारूचा अवैध साठा नवापूर पोलिसांनी जप्त केला आहे. शेतात लपवून ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. यात सुमारे देशी दारूचे ५० बॉक्स पोलिसांना आढळून आले आहेत. 
 
नवापूर पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार आमलीफळी, तिनटेंबा या गावातील हरीश मावची याचे शेतातील झोपडीत अवैधरित्या देशी दारूचा साठा करून ठेवला आहे. तेथून गुजरात राज्यात विक्री करिता घेवून जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने सुमारास छापा टाकून पाहणी केली असता सदर ठिकाणी २ मोटरसायकलसह मेहुल राकेश नायका (रा. तिनटेबा, ता. नवापूर) व अतुल मुंगा गामित (रा. पटेल फळीया, उच्छल, गुजरात)हे संशयित मिळून आले. 
 
पोलिसांनी त्यांनाविचारपूस केली असता शेतातील झोपडीची झडती घेत देशी दारूचे ५० बॉक्स मिळून आले. सदर देशी दारू बॉक्सबाबत त्यांचेकडे विचारपूस करता सदर मुद्देमाल दोघांसह आकाश मावची (रा. आमलिफळी, तिनतेंबा, ता नवापूर) व सुरेंद्र उर्फ सुंदर यांनी मिळून आणलेबाबत त्यांनी सांगितले. त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच सदर गुन्ह्यात ३ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *