Nandurbar Bus Accident : खड्डा चुकविताना बसची ट्रकला जोरदार धडक; बसचा पत्राच कापला गेला, प्रवाशी सुखरूप

नंदूरबार : नंदूरबार ते तळोदा कमी अंतरात जोडणाऱ्या हातोळा पुलावर बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. बसने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असून यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अक्कलकुवा आगाराची बस तळोदा येथून नंदुरबारकडे जात मार्गस्‍थ झाली होती. या दरम्‍यान सकाळी तापी नदीवरील हातोडा पुलावरून जात असताना समोरून ट्रॉलीमध्ये खाली ड्रम भरून येणाऱ्या ट्रॅक्टरला हातोडा पुलावरील जीवघेणा खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात बसने जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या समोरील एका बाजूचा पत्रा कापला जाऊन बसचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच निझर पोलिस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी दाखल झाले. अपघातामुळे पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. उशिराने घटनास्थळी परिवहन मंडळाचे अधिकारी आणि निझर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदणीचे प्रक्रिया सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply