Nandurbar News : नामांकित शाळेत विद्यार्थिनीने आयुष्याची दोर कापली, आई-वडिलांचा शाळेच्या आवारात आक्रोश

Nandurbar : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. पुण्यातील स्वारगेड डेपोतील प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. आता या प्रकरणाची पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुनावणी सुरु आहे. याचदरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहादा तालुक्यातून समोर आली आहे.

शहादा तालुक्यातील एका नामांकित शाळेत एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारी १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची बातमी तिच्या कुटुंबियांना कळल्यानंतर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी शाळेच्या आवारात एकच आक्रोश केला. दरम्यान, संबंधित शाळेतील व्यवस्थापकीय आणि मुख्याध्यापकावर नातेवाईकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply