Nandurbar : मांजामुळे झालेला अपघात पाहिला अन् घडले मोठे कार्य; १८ वर्षांपासून पाच दिवस व्यवसाय बंद ठेवत करतात अनोखे काम

Nandurbar : एखादी घटना मानवी मनावर इतका परिणाम करून जाते की त्यातून एक मोठं काम उभे राहत असते. याचाच अनुभव नंदुरबारमध्ये येत आहे. शहरातील युसुफ खानच्या संदर्भात १८ वर्षापूर्वी संक्रांतीनंतर रस्त्यावर पडलेल्या मांजामुळे झालेला अपघात पाहिले. त्यानंतर दर वर्षी संक्रांतनंतर पाच दिवस ते शहरातील कानाकोपऱ्यात फिरून झाडावर लटकलेल्या अवस्थेत असलेल्या आणि रस्त्याच्या कडेला मांजा गोळा करून ते नष्ट करण्याचे काम करत आहेत.

मकरसंक्रांतीला ठिकठिकाणी पतंगोत्सव साजरा केला जात असतो. यासाठी मांजाचा देखील वापर केला जात असतो. नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर असल्यामुळे गुजरात प्रमाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत पतंग मोहतस्व साजरा होतो. मात्र या काळात पतंग कट झाल्यावर मोठ्या प्रमाणात मांजा झाडावर अटकतो किंवा रस्त्याचा कडेला जाऊन पडतो. त्यामुळे रस्त्याने जाणारे येणाऱ्या जायबंदी होत असतात.

मांजा गोळा करून करतात नष्ट

दरम्यान साधारण १८ वर्षापूर्वी युसुफ खान यांनी मांजामुळे जखमी झालेला पक्षी पाहिला आणि मांजामुळे झालेल्या आपघातात जायबंदी झालेले लोक देखील पाहिले. त्या दिवसापासून त्यांनी संकल्प करत संक्रांतीनंतर पाच दिवस शहरातील कानाकोपऱ्यात फिरून मांजा गोळा करण्यास सुरवात केली. हा मांजा गोळा केल्यानंतर तो नष्ट करतात. सलग पाच दिवस ते शहरातील विविध भागात फिरत असतात.

पाच दिवस बंद ठेवतात व्यवसाय पान टपरी चालक असलेल्या युसुफ खान हे पर्यावरण पूरक काम करत आहेत. मकरसंक्रांतीचा सण साजरा झाल्यानंतर पुढचे पाच दिवस आपला व्यवसाय बंद ठेऊन शहरात फिरण्यासाठी निघतात. अर्थात वेगवेगळ्या भागात फिरताना कारंजा गोळा करण्याचे कार्य करत असतात. एखाद्या चांगल्या कामात आर्थिक परिस्थिती आड येत नसल्याचे त्यांनी दाखवून दिलं आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply