Nandurbar Crime : शाळा, कॉलेजपासूनच काही अंतरावर खुलेआम देहविक्री; नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

 

Nandurbar : शाळा, महाविद्यालय असलेल्या आजूबाजूच्या परिसरात गुटखा, नशेचे पदार्थ विक्री करण्यास मनाई आहे. तर शाळा, महाविद्यालयांच्या अवघ्या ३०० मीटर हद्दीत असलेल्या मुख्य रस्त्यांवर देहविक्रीचा काळा धंदा सुरू असल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार नंदुरबार शहरात समोर आला आहे. अर्थात ज्या रस्त्यावरून विद्यार्थी जातात. त्याच रस्त्यावर हा प्रकार सुरु आहे.

नंदुरबार शहरातील नामांकित चार मोठ्या शाळा, महाविद्यालय असून विद्यार्थी या भागातून दिवसभर ये- जा करत असतात. याच रस्त्यावर अनेक आंबट शौकीन उभे असल्याने अनेक महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असतो. याच मुख्य रस्त्यावरून अनेक शासकीय अधिकारी, राजकीय पुढारी आणि पोलीस अधिकारी प्रवास करत असतात. मात्र या शारीरिक सुखाचा बाजाराकडे सर्वच दुर्लक्ष करतात का जाणून बुजून डोळे झाक केली जाते.

महिला, विद्यार्थिनी मान खाली घालून काढतात वाट

नंदुरबार बसस्थानकाच्या बाजूला अनेक महिला भर रस्त्यावर वेश्या व्यवसाय करत असल्याने याच मुख्य रस्त्यावरून दररोज खेड्यांवरून येणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जात असतात. भर रस्त्यावर या महिला ग्राहकांची वाट बघत अश्लील चाळे करत असतात. अशातच वाटेतून जाणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींना खाली मान घालून या परिसरातून वाट काढावी लागत असल्याचं लाजिरवाणा प्रकार सध्या सुरू आहे.

परिसरात नेहमीच वर्दळ शाळा, महाविद्यालय असलेल्या या परिसरात मुख्य बाजारपेठ, बस स्थानक, रेल्वे स्थानक, भाजीपाला मार्केट देखील समोर आहे. यामुळे या भागात दिवसभर वर्दळ पाहण्यास मिळते. विद्यार्थी तसेच मार्केटमध्ये येणाऱ्या महिला व नागरिकांची या भागात गर्दी असते. अशा मुख्य रस्त्यांवर सुरू असलेला हा देहविक्रीचा बाजार कधी बंद होईल? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply