Dhadgaon Rain : आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर धडगाव शहरात पुन्हा पाऊस; दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

Nandurbar : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात अजूनही अपेक्षित असा दमदार पाऊस झालेला नाही. मागील आठवड्यात पाऊस झाला होता. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे पिकांना देखील संजीवनी मिळणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. मागील आठवड्यात नवापुरमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे प्रचंड नुकसान झाले होते. दरम्यान राज्यातील अनेक भागात मागील पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे.  पावसाची संततधार सुरु असल्याने शेतकऱ्याला शेती काम करण्याची देखील संधी मिळत नाही. शिवाय पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या उलट चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.

Mumbai : निवडणुकीनंतर ‘एक तर तू राहशील, नाही तर मी’! फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करीत उद्धव ठाकरे यांची टीका

 

धडगाव शहरात पाऊस

नंदुरबार जिल्ह्यात अजून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र मागील आठड्यानंतर झालेल्या पावसानंतर आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर धडगाव शहरात आज दुपारच्या सुमारास पुन्हा पाऊस पडण्यास सुरवात झाली. या पावसामुळे शेती पिकांना चांगला फायदा होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

 
 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply