Nandurbar : सोलर प्लेटच्या आडून अमली पदार्थ तस्करी; नंदुरबारमध्ये लाखो रुपयांचा अमली पदार्थ जप्त; चालकाला अटक

Nandurbar : धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर शिवाराजवळ विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मोठ्या ट्रॅक्टरमध्ये लाखो रुपयांचा अमली पदार्थ वाहतूक केला जात होता. यात चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धुळे- सुरत महामार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विसरवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महालक्ष्मी हॉटेलसमोर सापळा रचून ट्रॅक्टर- ट्रॉलीला थांबवले. संबंधित ट्रॅक्टर बेंगळुरूहून गुजरातच्या दिशेने सोलर प्लेट्स घेऊन जात असल्याचे दर्शवले जात होते. मात्र तपासणी दरम्यान सोलर प्लेट्सच्या आड चार मोठ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवलेला अमली पदार्थ सापडला.

Mumbai Coronavirus : काळजी घ्या! मुंबईत कोरोना परतला, २ संशयित रूग्णांचा मृत्यू?

८० किलो वजनाचा माल जप्त

तपासणीसाठी घटनास्थळी न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक परीक्षणात चारही पिशव्यांमध्ये एकूण ८० किलो वजनाचा 'अमल दोंडा' हा अफिम सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची बाजारभावानुसार किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगितले जात आहे. 'अमल दोंडा' हा पदार्थ पाण्यात मिसळून घट्ट करून सेवन केला जातो. ज्यामुळे अतिशय तीव्र नशा येते. हा पदार्थ मुख्यतः नशेच्या व्यसनासाठी वापरला जातो.

चालकाला घेतले ताब्यात

हा संपूर्ण माल प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला होता. या प्रकरणी ट्रॅक्टरचा चालक रूपचंद प्रजापत (वय ३५, रा. मांगणे की ढाणी, जि. बाडमेर, राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून कारवाइतून मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीला लगाम बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply