Nandurbar : नंदुरबार जिल्‍ह्यात अवकाळी पाऊस; खांडबारा आठवडे बाजारात धावपळ

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी आणि खांडबारा परिसरामध्ये दुपारी अवकाळी पावसाला अचानक सुरुवात झाली. यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. तसेच रविवारी खांडबारा येथे आठवडे बाजार असल्याने अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व्यापारी व भाजीपाला विक्रेतांची मोठी धावपळ झाली. 

दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने सर्वत्र उकाळा जाणवत होता. तसेच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याचप्रमाणे नवापुर तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा गावासह परिसरात दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवार दुपारी तीन वाजून ४५ मिनिटानंतर विसरवाडी गावासह परिसरात १५ मिनिट पावसाने हजेरी लावली.

अचानक आलेल्‍या पावसामुळे शेतकऱ्यांसह धान्य व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली असून धावपळ सुरू झाली होती. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामाचे किरकोळ नुकसान झाले आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागात दिला आहे. त्यामुळे उघड्यावर पिकं किंवा अन्य वस्तू ठेवू नये अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *