Nanded News : अशोक चव्हाणांचा काँग्रेसला 'दे धक्का'; ५५ नगरसेवकांनी ठोकला पक्षाला रामराम

Nanded News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच अशोक चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील तब्बल ५५ नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. भाजप प्रवेश आणि राज्यसभेवर निवड लागल्यानंतर काल काँग्रेसला धक्का पहिल्यांदाच नांदेडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केल्याचे पाहायल मिळाले.

Nagpur Firing Case : राज्यात चाललंय काय? नागपुरात दिवसाढवळ्या एकाची गोळ्या झाडून हत्या

जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत मोठ्या दणक्यात स्वागत केल्याचे पाहून अशोक चव्हाणही भावूक झाले होते. आता नांदेडमध्ये एन्ट्री करतानाच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. नांदेडमधील ५५ नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतः चव्हाण यांनी ट्वीट करत या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे.

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी आज विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, असे अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply