Nanded News : भरधाव कार पुलावरून खाली कोसळली; भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील घटना

Nanded News : नांदेड जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. भोकर-उमरी रस्त्यावरील मोघाळीजवळील कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट पुलावरून खाली कोसळली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 

रात्रीची वेळ व नाल्यात पाणी असल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर निघण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने रब्बी पिकांच्या रक्षणासाठी जवळच्या शेतात असलेले मोघाळी व हाळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी वेळेवर मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. तसेच अपघाताची माहिती भोकर पोलिसांना दिली. 

Raj Thackeray : 'कायदे आहेत, पण ऑर्डर नाहीत, मुंबई पोलिसांना ४८ तास द्या...' गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंच ट्वीट

सविता श्याम भालेराव (वय २५), प्रीती परमेश्वर भालेराव (वय ८) सुशील मारोती गायकवाड (वय ९) रेखाबाई परमेश्वर भालेराव(वय ३०),अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव(वय २८) अशी मृतांची नावे आहेत. मृत व्यक्ती भोकर तालुक्यातील रेणापूर गावातील रहिवासी आहेत.

अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे राहत होते .

नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने गुरुवारी (८ फेब्रुवारी) ते नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आले होते. कार्यक्रम आटोपून ते कारने तेलंगणा येथे जात होते. दरम्यान, भोकर-उमरी रस्त्यावरील मोघाळीजवळील रात्री चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरू खाली कोसळली.

या अपघातात तिघांचा जागेवरच तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला, तीन लहान मुले आणि अन्य दोन अशा ५ जणांचा समावेश आहे. या घटनेनं संपूर्ण रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply