Nanded News : रस्ते जाम असल्याने एसटीच्या ८० फेऱ्या रद्द; इंधन साठा मुबलक असल्याचा दावा

Nanded News : राज्यभरात ट्रक चालकांचा संप सुरु असल्याने याचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. ट्रक चालकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. रस्ते अडविण्यात येत असल्याने वाहतूक खोळंबल्या आहेत. यामुळे नांदेड आगारातून जाणाऱ्या  एसटीच्या ८० फेऱ्या रद्द करण्यात आलय आहेत.

ट्रक चालकांचा संप सुरु असल्याने इंधन पुरवठा करण्यावर प्रामुख्याने परिणाम झाला आहे. यामुळे  पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत असून पेट्रोल पंप देखील बंद पडले आहेत. या कारणाने बस फेऱ्यावर देखील याचा परिणाम झाल्याचे पाहण्याचे मिळत आहे. दरम्यान नांदेड- लातूर, नांदेड- हैदराबाद, नांदेड- नागपूर या मार्गावर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावर रास्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता असल्याचे बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

Loksabha Election 2024 : शरद पवार फुंकणार लोकसभेचे रणशिंग; शिर्डीत राष्ट्रवादीचे २ दिवसीय शिबीर

आगारात ४० हजार लिटर इंधन 

नांदेड आगारातून ८० बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. या फेऱ्या वाहतूक खोळंबल्यामुळे रद्द झाल्या असुन इंधन साठा मुबलक असुन काही ठिकाणी रास्ता रोको असल्याने बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापकानी दिली. दरम्यान नांदेड आगारात ४० हजार लिटर इंधन असल्याचे सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply