Nanded News : नांदेडमध्ये १२ घरफोडी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nanded News : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही काळात घरफोड्यांचे  सत्र सुरु होते. या भागात १२ घरफोडी झाल्याच्या घटना घडल्यानंतर या चोरट्याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे सत्र सुरु होते. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनीअटक केली. त्याच्याकडून २५ लाख ६५ हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या महिन्यात शहरातील फरांदे नगरात घर फोडुन सोन्या चांदीच्या दागिन्यासह इतर साहीत्य  चोरी गेले होते. भाग्यनगर  पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील जवळपास दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला. 

Political News : शरद पवारांनी खूपच लवकर वेगळी भूमिका घेतली म्हणणाऱ्या अजितदादांना सुप्रिया सुळेंचं उत्तर; म्हणाल्या, तेव्हा...

चोरट्याने दिली कबुली 

आरोपीला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता आरोपीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, कॅमेरा, मोबाईल फोन, एलईडी टीव्ही यासह २५ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply