Nanded News : आरक्षणासाठी युवकाने संपविले जीवन; तामसा शहरात टायर जाळून कडकडीत बंद

नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाने आत्महत्या केल्याने नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा शहरात टायर जाळून बंदचे आवाहन करण्यात आले. तामसा शहर सकाळपासून कडकडीत बंद करण्यात आले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा शहरापासून जवळच असलेल्या वडगाव येथील शुभम पवार या २४ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मराठा बांधवानी टायर जाळून तामसा शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले. सध्या तामसा शहर पूर्णतः कडकडीत बंद असून मोठा पोलीस बंदोबस्त तामसा शहरात लावण्यात आला आहे.

Airplane Crashed In Pune : बारामतीजवळ शेतात विमान कोसळलं, परिसरात एकच खळबळ

५० लाखांची मदतीची मागणी 

जोपर्यंत शुभम पवार या तरुणाच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी आणि घरकुल देण्याचे आश्वासन दिले जाणार नाही; तोपर्यंत शुभम पवारचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply