Nanded Hospital Death : कमनशिबी आई! उपचारांसाठी मंगळसूत्रही गहाण ठेवलं, पण तिला जुळ्या बाळांचा चेहराही बघता आला नाही!

Nanded Hospital Death : शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या एका माऊलीने ९ महिने ९ दिवस पोटात जुळी लेकरं वाढवली. पण जन्मानंतर या लेकरांची अचानक तब्येत खालावली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पण दोन्ही लेकरांवर तातडीने उपचार व्हावेत, म्हणून या माऊलीने आपलं मंगळसूत्र देखील गहाण ठेवलं. 

पण नियतीने घात केला, सर्वकाही सुरळीत असताना एकाच दिवशी ही दोन्ही बाळं दगावली. मन सुन्न करणारी ही घटना ३२ वर्षीय शेतकरी महिला संगीता मनोज खैरवार यांच्यासोबत घडली. नांदेड येथील घटनेत संगीता यांनी आपली जुळी मुलं गमावली आहेत.

Mla Disqualification Case : शिवसेना 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर; कोर्टाने दिली नवी तारीख

मुलांच्या विरहानं या माऊलीने दोन दिवसांपासून अन्नाचा त्याग केलाय. संगीता मूळच्यानांदेड जिल्ह्यातल्या त्यांचा विवाह मनमाड येथील मनोज खैरवार यांच्यासोबत झाला होता. मनोज शेतकरी असून ते रात्रंदिवस काबाडकष्ट करतात. लग्नानंतर काही दिवस या दाम्पत्याला मूलबाळ झालं नाही. त्यावर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला देखील घेतला.

अखेर संगीता आणि मनोज यांना गोड बातमी मिळाली. तुम्ही आई-बाबा होणार आहात, असं डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सांगितलं. आपल्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. दोन बाळं घरात खेळताना, बागडताना दिसतील, असं स्वप्न या दाम्पत्यानं बघितलं होतं.

२८ सप्टेंबर रोजी संगीता यांनी नांदेड येथील एका रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला. पण जन्मानंतर त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तातडीने मोठ्या रुग्णालयात दाखल करा, असा सल्ला दिला. पण पैसे नाहीत. काय करायचं या विवंचनेत हे दाम्पत्य होतं.

पण पोटच्या गोळ्यांवर उपचार व्हायला हवेत. म्हणून संगीता यांनी आपलं सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्रही गहाण ठेवलं. त्यानंतर दोन्ही बाळांना नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, दोन दिवसानंतरच दोन्ही लेकरांनी या जगाचा निरोप घेतला.

संगीता यांना त्यांना डोळे भरून बघताही आलं नाही. “मी त्यांना माझ्या मिठीत घेऊ शकले नाही आणि त्यांचे चेहरेही बघितले नाहीत… त्यांच्या उपचारासाठी मी माझे मंगळसूत्रही विकले…,” असं म्हणत संगीता यांनी हंबरडा फोडला. या घटनेला रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply