Nanded Civil Hospital : धक्कादायक! नांदेड शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्ण दगावले; मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश

Nanded Civil Hospital : राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांना औषधी मिळू शकत नाही. परिणामी अत्यवस्थ रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यात नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यूझाल्याचे समोर आले आहे. 

शासकीय रुग्णालयात औषधी पुरवठा करणाऱ्या हाफकीनने औषधी खरेदी बंद केली आहे. यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दरम्यान अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. 

Kalyan News : मराठी तरूणाला परप्रांतीय फेरीवाल्यांकडून मारहाण; मनसे कार्यकर्त्यांनी चोपून काढले

सदरच्या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता; असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply