Nana Patole : पुलवामा हल्ल्यातील स्फोटके नागपुरातून गेले; पटोलेंचा खळबळजनक दावा

नागपूर - महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपस्थित होते.

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी खळबळजनक दावे केले आहेत. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान मारले गेले होते. या जवानांचे मृत्यू सरकारचं अपयश म्हणत त्यांनी मोदींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून नाना पटोले खळबळजनक विधान केलं.

पुलवामामध्ये सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील आरडीएक्स हे नागपूरमधून गेले होते, असा खळबळजनक दावा नाना पटोले यांनी केला. नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजधानी मानली जाते. तिथेचं पटोले यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. पुलवामा हल्ल्यासाठी ३०० किलो आरडीएक्स वापरण्यात आलं होतं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *