Namo Rojgar Melava : मदभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत; नमो रोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? जाणून घ्या

Namo Rojgar Melava : बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्याचं आयोजकरण्यात आलं आहे. या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह, सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. कार्यक्रम सुरू होण्याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले मदभेद आहेत, मात्र कोणाशीच मनभेद नसल्यांचं सांगितलं. आपल्याला भारत सरकारने कार्यक्रमाला आमंत्रित केल्याचंही त्यांनी सांगितलं. पवारांच्या बालेकिल्ल्यात हा कार्यक्रमत होत असल्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहतील की नाही, यावर तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र सर्वच पवार कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शिवाय शरद पवारांचं नाव घेताच. उपस्थित विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

सर्वच पक्षांतील नेत्यांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. वैचारिक मतभेत असतात आणि यापुढेही राहतील. मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काही चांगलं होत असेल तर एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला या कार्यक्रमासाठी भारत सरकारने आमंत्रित केलं आहे.

Parbhani Accident News : कामासाठी घराबाहेर पडला अन् वाटेतच घात झाला...; दुचाकी-ट्रक अपघातात एक जण जागीच ठार

नमो रोजगार मेळाव्यातून सुरुवातीला ४३ हजार नोकऱ्या मिळणार असल्यांची माहिती मिळाली होती, त्यानंतर ३० नोकऱ्या मिळणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र हा महा रोजगार मेळावा नसून महास्किल कार्यक्रम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय संदर्भात एक लॅब तयार होत आहे. त्यासंदर्भात चर्चा झाली. सुनेत्रा पवार यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

या कार्यक्रमाला निलम गोऱ्हे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, मंगल प्रभात लोढा, उदय सामंत, सुनेत्रा पवार उपस्थित आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सन्मान सुरू असताना बारामतीकर एकच जल्लोश केला. या कार्यक्रमात पवार कुटुंबीय उपस्थित असल्यामुळे सर्व महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply