
Vasai : बनावट कागदपत्रे आणि अधिकारांचा गैरवापर करून तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या जमिनीचा घोटाळा नायगावच्या टिवरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी, महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह चार जणांवर नायगाव पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
मुंबईतील धनश्री डेव्हलपर्स प्रा. लि कंपनीचे संचालक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शंकरराव बोरकर (६६) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. हेमंत पाटील आणि धर्मेश शहा यांनी २००८ पासून आपला विश्वास संपादन केला होता. मात्र, नायगाव येथील मौजे टिवरी येथील ६५.३३ एकर जमीन त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदा विकली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बोरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जमिनीचे रितसर सात-बारा उतारे, नोंदणीकृत खरेदीखत आणि साठेकरार अस्तित्वात होते. कालबाह्य आणि रद्द झालेले मुखत्यारपत्र वापर वापरून तसेच बिगर-नोंदणीकृत कागदपत्रांआधारे अनेक सर्वे नंबरच्या जमिनी परस्पर विकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
|
|
बोरकर यांच्या संमतीशिवाय डीडीपीएल ग्लोबल प्रा. लि. आणि युनिकॉर्न इंका अँड इस्टेट प्रा. लि. या कंपन्यांच्या नावावर जमिनीची खोटी नोंदणी करण्यात आली. या घोटाळ्यात केवळ खासगी व्यक्तीच नव्हे, तर सरकारी यंत्रणेवरही ठपका ठेवण्यात आला आहे. वसई-२ निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, तहसीलदार आणि तलाठ्यांनी महसुली नियमांचे उल्लंघन करून आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी बुधवारी नायगाव पोलिस ठाण्यात हेमंत पाटील, धर्मेश शहा, दीपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Naigaon : तब्बल 1000 कोटींचा जमीन घोटाळा उघड; बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक, शासकीय अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?”