नागपूरला पावसाने धुतलं, 47 मिमी पावसाची नोंद, पुढच्या 3 तासात मुसळधार पावसाचा अंदाज!

Nagpur Rain News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change)  होत आहे. कुठं उष्णतेची लाट आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात पावसानं (Rain) देखील हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये सकाळी जोरदार पावसानं (Nagpur Rain) हजेरी लावली. तासाभरात नागपूरमध्ये 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 पुढील तीन तासात पुन्हा नागपुरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

आज सकाळी नागपूरकर जेव्हा जागे झाले तेव्हा निरभ्र आकाश आणि चांगलं ऊन होतं. मात्र, नऊ वाजता अचानकच वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी नागपूरचा  आकाश व्यापून टाकलां. त्यामुळं साडेनऊ वाजता नागपुरात संध्याकाळ व्हावी असा अंधार पसरला होता. सव्वानऊ वाजल्यापासून सुमारे एक तास नागपुरातील वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटानं कंबर कसली; मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंच्या नावाची चर्चा

तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून खाली पडल्या आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाहनांवर पडल्या आहेत. त्यामुळं वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन तासात पुन्हा नागपुरात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply