Nagpur Rain News: नागपुरात पावसाचा कहर! रस्त्यांवर, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ; शाळा- महाविद्यालयांना सुट्टी

Nagpur Rain News : नागपूर शहरात पावसाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी (२३, सप्टेंबर) मध्यरात्री शहरात मुसळधार पाऊस झाल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मध्यरात्री अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत असून शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (२२, सप्टेंबर) दिवसभर नागपूरमध्ये पाऊस सुरू होता. सायंकाळनंतर या पावसाची तीव्रता अधिकच वाढली. धुव्वाधार पावसामुळेअंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. तलावातून मोठ्या प्रमाणातून पाणी बाहेर पडल्याने रस्त्यालगत असलेल्या शेकडो घरांमध्ये पावसाचं पाणी शिरले ज्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सुसाट कार दुभाजकाला धडकली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

नागरिकांना सुखरूप बाहेर काढले...

पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफच्या (NDRF) टीम कार्यरत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या (SDRF) टीमने आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तसेच मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

शाळा- महाविद्यालयांना सुट्टी....

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच तातडीने मदत करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply