Nagpur News : धक्कादायक! उपवासाचे थालीपीठ खाल्याने २० ते २५ जणांना विषबाधा; नागपुरातील घटना

Nagpur News : राज्यभरात महाशिवरात्रीच्या उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नागपूरमधूनही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरच्या त्रिमुर्तीनगरमध्ये महाशिवरात्रीला उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाशिवरात्रीला उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली. दोन दिवसांपूर्वी 20 दुकानांतून खाण्याचा उपवास भाजणी आटा देण्यात आला होता. एका खासगी कंपनीचे (श्री जी) भाजणी पीठ खाल्याने अनेकांना उलटी, मळमळ आणि चक्करचा त्रास होऊ लागला.

Police Patil Bharti : 'पोलीस पाटील भरतीमध्ये मोठा घोळ'; चौकशी होत नसल्याने अपात्र उमेदवारांकडून आमरण उपोषणाला सुरूवात

या त्रासानंतर रुग्णांना विविध खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहरातील व्होकार्ड, पडोळे, अवंतीका, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे रुग्ण भरती असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फूड निर्माती कंपनीवर कारवाईला सुरवात केली आहे.

अन्न व औषध विभागाने या घटनेची दखल घेतली असून कंपनीच्या मनुफॅक्चरिंग युनिट मधील खाद्य पदार्थांच्या कच्या मालाचे नमुने तपासण्यात येत आहेत. यासाठी २० दुकानातील सॅम्पल परत मागवले आहेत. हे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply