Nagpur News : नागपूर जिल्ह्यासाठी आऊटर रिंग रोड ‘लाईफलाईन’ ठरेल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nagpur News : नागपूरचा वाढता व्याप पाहता नवीन रिंग रोड लाईफलाईन ठरणार आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला या मार्गामुळे चालना मिळेल. येत्या काळात या रिंग रोडमुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्था 1 लाख कोटींची होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 856.74 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 33.50 किलोमीटरच्या आऊटर रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज डिजिटल पद्धतीने करण्यात आले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत. 

Yavatmal DCC Bank : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक कोटीचा दंड, आरबीआयची कारवाई

नागपूर शहर हे महाराष्ट्रातील व्यापार आणि वाणिज्यचे प्रमुख केंद्र आहे. नागपूर शहराचे भारताच्या औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. शहरातील बाह्यवळण मार्ग प्रकल्पाचा उद्देश नागपुरातील मालवाहतूक आणि कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करणे हा आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा फायदा होईल. शहरामधील जड वाहतुकीची गर्दी कमी होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, गुंतवणूक वाढेल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. 

राज्यातील सर्व महत्त्वाची देवस्थाने शक्तीपीठाच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. नागपूर ते गोवा असा हा शक्तीपीठाचा मार्ग असेल. लवकरच या मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, रस्ते, पाणी, दळणवळणाची साधने आणि वीज या चार बाबी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे विकासाला गती मिळते, गुंतवणूक वाढते, उद्योग येतात आणि रोजगार निर्माण होऊन गरिबी दूर होण्यास मदत होते. हिंगणा आणि बुटीबोरीमध्ये एमआयडीसी आल्यानंतर या भागाचा विकास झाला. हिंगण्याला स्मार्ट सिटी अशी ओळख मिळवून द्यायची आहे. नवीन रिंगरोडमुळे विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे. एअरपोर्ट स्टेशनपासून रिंगरोडच्या सुरुवातीपर्यंत आणि पुढे बुटीबोरीपर्यंतचा रस्ता हा सहापदरी होणार आहे. तसेच वाडीपासून कोंढाळीपर्यंत देखील सहापदरी रस्त्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply