Nagpur News : क्षणभर विश्रांती जिवावर बेतली! कापसाच्या ढिगाऱ्यावर झोपले अन् विपरीत घडलं; २ कामगारांचा मृत्यू

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कनक कॉटन इंडस्ट्रीजमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून या दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कनक कॉटन इंडस्ट्रीज कंपनी आहे. सोमवारी (१८, डिसेंबर) जिनिंगचे काम सुरू असताना मशीन बिघाड झाल्याने काम बंद पडले. काम बंद पडल्याने बिरमराम देदाराम भिल, पंकज मंगिलाल भिल हे दोघेही कामगार आराम करत होते.

Maharashtra Assembly Winter Session : ६ लाख ५६ हजार वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हे दोघेही तरुण कापसाच्या ढिगार्‍यावर जाऊन झोपले. हीच क्षणभराची विश्रांती या कामगारांच्या जिवावार बेतली. गाढ झोपेत असतानाच कापसाचा ढीग कोसळल्याने दोघेही त्याखाली दबून राहिले. त्यात गुदमरून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी जेव्हा इतर मजूर कामावर आले, तेव्हा त्यांना शंका आली आणि शोधा शोध सुरू झाली.

यावेळी हे दोघेही कापसाच्या ढिगाऱ्यखाली मिळून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नागपूरमधील बाजारगाव येथील सोलार कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत ६ महिलांसह ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply