Nagpur News : दारू प्या, मटण खा, हवं तर पैसेही घ्या; पण आम्हाला न्याय द्या, नागपुरात शेतकऱ्यांचं आगळं वेगळं आंदोलन

Nagpur News : शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याच्या रक्कमेबाबत तक्रार करून देखील रक्कम मिळत नाही. यामुळे दारू प्या, पैसे घ्या, मटण खा; पण शेतकऱ्यांना न्याय द्या; असे म्हणत काटोल येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात आगळेवेगळे आंदोलन केले आहे. जवाब दो यात्रेचे समन्वय सागर दुधाने यांनी शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले आहे. 

पिकांना संरक्षण म्हणून पीक विमा योजना शासनाने आणली आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिकांचा विमा उतरविला आहे. मात्र पिकांचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा संदर्भात तक्रारींना घेऊन निवेदन देण्यात आले. मात्र तरीही दखल न घेतल्याने कृषी अधिकारी कार्यालयात हे आंदोलन  करण्यात आले. अधिकारी दारू, पैसे, मटण खाल्ल्याशिवाय काम करत नसल्याचा आरोप करत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
 
३ जुलैला बैठक 
शेतकऱ्यांच्या कापूस पीक विमा संदर्भात अनेक तक्रारी होत्या, मात्र अनेकांना नुकसान भरपाईचा पहिलाच हफ्ता मिळाला. यासह विविध विषयाना घेऊन तक्रारी होत्या. यासाठी आज आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलनावेळी एकही वरिष्ठ अधिकारी नव्हता. अखेर पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आता ३ जुलैच्या बैठकीत मार्ग न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply