Nagpur Firing Case : राज्यात चाललंय काय? नागपुरात दिवसाढवळ्या एकाची गोळ्या झाडून हत्या

Nagpur Firing Case : राज्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. नागपुरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने नागपूर हादरून गेलं आहे. नागपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात एकाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. घरात घुसून काहींनी गोळ्या झाडल्या आहेत. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपुरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजनगर या भागात ही घटना घडली आहे. 

Eknath Shinde Meets Udayanraje Bhosale : मुख्यमंत्री म्हणाले, उदयनराजेंच्या साक्षीने सांगताे...

हत्या झालेला व्यक्ती जुना प्रेस फोटोग्राफर असल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने काम सोडून अनेक वर्षे झाले आहे. विनय पूनेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply