Nagpur Crime News : नागपूरमध्ये मोठी कारवाई! ५० किलो गांजासह दोघांना अटक, तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur Crime News : मेट्रोसिटी नागपूरमध्ये विकण्यासाठी कारमधून गांजा तस्करी करणाऱ्या उत्तरप्रदेशातील दोघांच्या मुसक्या आवळण्यात शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा मार्गावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यशपाल चव्हाण आणि अंकित श्यामवीर सिंग अशी अटकेतील आरोपींची नावे असून दोघेही उत्तरप्रदेशचे आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 50 किलो गांजासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला विशाखापट्टण येथून एका पांढऱ्या रंगाच्या टोयाटो कंपनीची कारमध्ये गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेलतरोडी परिसरातील वर्धा मार्गावर सापळा रचला.

Income Tax : केंद्र सरकारची 1 लाख रुपयापर्यंतची करमाफी! देशातील 1 कोटी करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा

पोलिसांनी बेलतरोडी परिसरातील वर्धा मार्गावरील बुटीबोरी ते एअरपोर्ट दरम्यान HR 26/ AX 0127 क्रमांकाची कार येताना दिसली. यावेळी पोलिसांनी कार थांबवून झडती घेतली असता डिक्कीत पांढऱ्या रंगाच्या पोत्यात सात लाख 61 हजार किमतीचा 50 किलोआला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपींना अटक केली.

तसेच त्यांच्याकडून गांजासह कार आणि दोन मोबाइल असा एकूण 17 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये पोलीस तपास पथक उत्तरप्रदेशला रवाना झाले असून आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply