Nagpur News: RBI समोर शेंगदाणे विकणाराच सुत्रधार, नागपुरात २ हजारांच्या नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Nagpur : आधी ५०० मग १००० नंतर २००० हजारांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. मागील दीड वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेनं २ हजार रूपयांची नोट चलनातून बाद केल्या होत्या. २ हजार रूपयांवर बंदी घालण्यापूर्वी, रिझर्व्ह बँकेनं नोटा बदलून घेण्याचं आवाहन केलं होतं. अनेकांनी त्या नोटा बदलून घेतल्या होत्या. मात्र अजूनही काही ठिकाणी २ हजार नोटा बदलवून मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, ४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं चलनातून बाद केलेल्या २ हजार रूपयांच्या नोटा बदलवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत, रॅकेटचा पर्दाफाश केला असून, पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच या रॅकेटमध्ये मोठी व्यापाऱ्यांची टोळी असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी मिळाली होती.

या रॅकेटमध्ये चलनातून बाद केलेल्या २ हजार रूपयांची नोट बदलवून देण्यात येत होती. मजुरांच्या माध्यमातून बाद केलेल्या २ हजार रूपयांच्या नोटा बदलण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांशी रॅकेटचं कनेक्शन होतं. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मजुरांना काही रूपयांचं आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रूपयांच्या नोटा बदलवून घेण्याचं काम सुरू होतं.

यामागं व्यापाऱ्यांची मोठी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, नागपूर पोलिसांनी कारवाई केली. याच माहितीच्या आधारावर दलाल नंदलाल मोर्या, व्यापारी अनिलकुमार जैन आणि किशोर बोहरिया यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आलीय. या टोळीचा मुख्य आरोपी अनिलकुमार जैन असून, त्यांनी आतापर्यंत कोट्यवधीच्या नोटा बदलवून दिल्याची माहिती आहे. एका शेंगदाण्या मजुराला हाताशी धरून आरोपी रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झालं.

आरोपी अनिलकुमार जैन उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधून २ हजारांच्या चलनी नोटा आणायचा. नंदलाल मोर्या बदलून द्यायचा. नंदलाल मोर्या याचं संविधान स्वायर परिसरात शेंगदाणे आणि स्नॅक्सचं दुकान आहे. याच भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्यालय आणि विधीमंडळ आहे. तो गरीब मजुरांना २ हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी रोजंदारी द्यायचा. ३०० ते ४०० रूपये देऊन नोटा बदलून घ्यायचा. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply