Nagpur Crime : नागपूर हादरले; लग्न मंडपातच हत्या, दुसऱ्या घटनेत किरकोळ वादातून मित्राचा खून

Nagpur : रात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. यातील एका घटनेत लग्न समारंभात गोंधळ घालणाऱ्या मित्रांची समजूत काढत बाहेर घेऊन गेलेल्या नवरीच्या भावाचीच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटने किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे.

नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेत विहांग रंगारी या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची लग्न समारंभाच्या हॉल बाहेर हत्या करण्यात आली आहे. यात विहांग रंगारी हा त्याच्या मित्राच्या बहिणीचे लग्न होते. या लग्न सोहळ्यासाठी आलेले बिरजू वाढवे आणि लखन वाढवे हे दोन गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी लग्नाच्या ठिकाणावर येऊन गोंधळ घालण्यास सुरवात केली. यावेळी नवरी मुलीच्या भावाने त्यांची समजूत काढून तिथून बाहेर काढले.

समजूत काढणाऱ्या मित्राला मारले

लग्न समारंभ असलेल्या हॉलच्या बाहेर आणल्यानंतर देखील दोघेजण गोंधळ घालत होते. यामुळे विहांग हा बाहेर आला. मित्राच्या बहिणीचा लग्न सुरू असताना त्या ठिकाणी होणारा गोंधळ पाहून विहांग याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत बिरजू आणि लखन यांना समजूत घातली. मात्र त्याचा राग धरून बिरजू आणि लखन वाढवे या दोन्ही भावांनी विहांग रंगारी याच्यावर चाकूने वार करत लग्न समारंभाच्या हॉल बाहेर हत्या केली. या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

मित्रांना भेटायला आला अन् जीव गमावला

तर नागपूरमध्ये घडलेल्या दुसरी घटना नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रामबाग परिसरात घडली. यात दीपक उर्फ सोनू वासनिक नावाच्या गुंडाची त्याचाच मित्र असलेल्या आकाश मेश्रामने दगडाने ठेचून हत्या केली. दीपक उर्फ सोनू वासनिक सराईत गुंड होता. त्याच्या विरोधात वर्धामध्ये ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. दोन दिवसापूर्वी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दीपक नागपुरात मित्रांना भेटायला आला होता. मद्यपान केल्यानंतर शाब्दिक वाद होऊन हत्येची ही घटना घडल्याची माहिती आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply