Panipuri Plan : पाणीपुरी प्रेमींसाठी आजन्म अनलिमिटेड प्लॅन; लाडक्या बहिणींना ६० रुपयात पोटभर पाणीपुरी

Nagpur : पाणीपुरी खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी पाणीपुरीच्या गाडीवर महिलांची अधिक गर्दी असते. साधारण १५ ते २० रुपये प्लेट असे दर आहेत. मात्र नागपुरातील एका पाणीपुरी विक्रेत्याने चक्क मोबाईल कंपनीप्रमाणे पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी प्लॅन तयार केले आहेत. यात लाडक्या बहिणींसाठी वेगळा प्लॅन असून अनलिमिटेड आजन्म पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी ९९ हजाराचा प्लॅन ठेवला आहे.

टेलीकॉम कंपनी प्रमाणे नागपुरात पाणीपुरी प्रेमींना प्लॅन देणारा सध्या जय दुर्गा अनलीमिटेड गुपचूपवाला जोरदार चर्चेत आहे. अनेक मोठ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत असतात. त्यानुसारच पाणीपुरी प्रेमींसाठी या पाणीपुरी विक्रेत्याने वेगवेगळे प्लॅन तयार करत एक दिवस, महिना आणि एक वर्षांसाठी विशिष्ट असे प्लॅन आखत त्यासाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत.

Shirdi crime news : दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली, साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

नागपुरात पाणीपुरी विक्रीसाठी आलेले विजय गुप्ता हे मुळचे यूपी मधील असून त्यांची तिसरी पिढी नागपुरात पाणीपुरी विकतात. वर्धा रोडवरील गोरक्षणकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचा खाली रोज पाणीपुरीचा ठेला लावून विक्री करत असतात. त्यांनी पाणीपुरी खवय्यांसाठी एक दिवस, एक महिना, एक वर्ष आणि आजन्म पाणी पुरी खाणाऱ्यासाठी वेगवेगळ्या प्लॅन ठेवून पाणीपुरी प्रेमींना आकर्षित करत आहे.

लाडक्या बहिणींसाठी ६० रुपयांचा प्लॅन

पाणीपुरी खाण्याची आवड असणाऱ्यांना आजन्म अनलिमिटेड गुपचूप पाणीपुरी खाऊ शकतात. यासाठी चक्क ९९ हजार रुपयांचा प्लॅन ठेवला आहे. एकदा ९९ हजार रुपये भरल्यानंतर सदरची व्यक्ती अनलिमिटेड पाणीपुरी खाऊ शकणार आहे. तर राज्यात सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळत असून याच अनुषंगाने या पाणीपुरी विक्रेत्याने लाडक्या बहिणीसाठी ६० रुपयात पोटभर पाणीपुरी प्लॅन दिला आहे. अर्थात महिलांसाठी मनसोक्त पाणीपुरी खाता येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply