Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळांनी स्वीकारला राज्यमंत्रीपदाचा कार्यभार, अमित शाहांचे घेतले मार्गदर्शन

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आज (ता. ११) सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी मंत्रालयाचे केंद्रीय सचिव डॉ. आशिष कुमार भूटानी यांनी मोहोळ यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले.

सहकार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यावर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीने काम चालते, राज्यमंत्र्यांची जबाबदारी काय असते, निर्णय कसे होतात, देशभरातील महत्त्वाच्या संस्थांबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली

Navi Mumbai : नवी मुंबईत ४० फूट लोखंडी कमान कोसळली, पोलीस प्रशासन मदतीला धावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार खात्याचे काम करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील सहकार चळवळीला बळ देणे, सहकार क्षेत्राबद्दल सामान्य नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम प्राधान्याने करणार आहे.

सहकार मंत्रालय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. सहकाराची पाळेमुळे देशाच्या ग्रामीण भागात पसरली असून या मंत्रालयामार्फत ग्रामीण जनतेसाठी काम करता येईल याचे मोठे समाधान आहे.

शहांकडून कौतुकाची थाप

मोहोळ यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी सहकार मंत्री शाह यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाह यांनी मोहोळ यांच्या पाठीवर थाप टाकत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply