Murlidhar Mohol : मतदान केंद्राचा कारभार पाहिला अन् मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रशासनावर संतापले!

Murlidhar Mohol :मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क आहे आणि मतदानाचा हक्क बजावायलाचं हवा. मात्र अनेकजण अनेक कारणं सांगून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा कंटाळा करतात. मात्र पुण्यातील एक तरुण थेट सिंगापूरहून मतदानासाठी पुण्यात आला मात्र त्याचं मतदार यादीत नावच नसल्याने त्याचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. 

पुण्यातील आयडियल कॉलनीत राहणारा श्रेयस कुलकर्णी हा मतदानासाठी सिंगापूरहून पुण्यात आला. पुण्यात येण्याआधी त्यांच्या वडिलांनी अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव बघितलं मात्र नाव सापडलं नाही. तरीही आपल्याला मतदान करता येईल या भावनेने श्रेयस काल पुण्यात आले. आज सकाळी ते पुण्यातील कोथरुड परिसरातील मतदार केंद्रावर गेले. त्या ठिकाणी त्यांनी आपलं नाव चेक केलं. मात्र त्यांचं नाव कोणत्याही यादीत सापडलं नाही. त्यामुळे श्रेयस यांना मतदान करता आलं नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. फॉर्म 17 भरुन मतदान करता येईस, असंदेखील सांगितलं होतं. मात्र तेही झालं नसल्याचं श्रेयस म्हणाले. मी आणि आमच्या सारखे काही तरुण वीर सावरकर चित्रपट पाहून आम्ही मतदान करायला आलो. पण साधारण तीस हजार लोकांची नावं डिलीट झाल्याची माहिती मिळाली. म्हणून आम्हाला मतदान करता आलं नाही, अशी खंत श्रेयस यांनी व्यक्त केली. 

Pune Lok Sabha : प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्यांमध्ये नाव येतं, मग मतदार यादीत का नाही? आजीबाई संतापल्या

निवडणूक यंत्रणेची मदत आणि चेहऱ्यावर मतदान केल्याचा आनंद

सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतचे मतदान केंद्र घराजवळ नसल्याने ते बदलून घराजवळचे मतदान केंद्र द्यावे किंवा वाहनाची व्यवस्था करावी अशी विनंती पालकांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे केलेली. या विनंतीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी तात्काळ प्रतिसाद देत मदतनीसासह वाहन नचिकेतकडे पाठवून त्याला मतदानासाठी बूथवर आणण्याची व्यवस्था केली. मतदानानंतरचा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.शारीरिकदृष्ट्या विकलांग (पीडब्ल्यूडी) मतदार असलेला नचिकेत शहरातील फ्लोरिडा इस्टेट केशव नगर, मुंढवा येथील रहिवासी आहे. त्याचे मतदार यादीतील नाव यादी भाग 31 - केशवनगर मुंढवा लिटिल आइन्स्टाईन प्रीस्कूल मध्ये आहे. मतदान केंद्र बदलून जवळचे देण्याची विनंती त्याचे वडील नीरज कुमार सिन्हा यांनी केली. मात्र ही मागणी करताना उशीर झालेला असल्यामुळे त्याला आहे त्याच मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आणण्याची सर्व व्यवस्था करण्याच्या विशेष सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या. त्यानुसार त्याचे मतदान करवून घेण्यात आले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply