Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीची संभाव्य तारीख समोर; जाणून घ्या, कोणत्या दिवशी रंगणार राजकीय रणधुमाळी?

Municipal Corporation Election Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही. त्यामुळेच आयोगाला ठरलेल्या निवडणूक कार्यक्रम आता बदलावा लागणार आहे. जिल्हा परिषदा निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार, आयोगाला ३१ जानेवारी २०२६ च्या आधी निवडणुका संपवायच्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर आलेली आहे.

निवडणुकीतील आरक्षणाच्या घोळामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले. १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही, त्यामुळे या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील फक्त दोन महापालिकात आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. या निवडणुका डिसेंबरमध्येच होऊ शकतात.

Pune : पुणे हादरलं! पीएमपीची वाट पाहत असलेल्या शाळकरी मुलावर अचानक हल्ला; धारदार शस्त्राने हात कापला

नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकेत राजकीय आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. १७ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आयोला सुनावले. निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली, तिथे निवडणुका घेता येणार नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे १७ जिल्हा परिषदा मागे ठेवून फक्त १५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेता येत नाहीत. त्यामुळे आता आयोगाकडून आधी महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पण त्यासाठीही आयोगाला १० डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. १० डिसेंबर रोजी महापालिकांची वार्डनिहाय मतदार यादी फायनल होईल. त्याचा आढावा आयोगाकडून घेतला जाईल. त्यानंतर तीन ते चार दिवसानंतर राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते.

नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. पण त्याआधीच राज्यात महापालिका निवडणुका लागतील, असा अंदाज वर्तवला जातोय. जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुका घेण्यासाठी आयोगाकडे फक्त ५० ते ५२ दिवसांचा कालावधी आहे. या काळात त्यांना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ महापालिका निवडणुका १५ डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत या कालावधीत होतील. तर झेडपी, पंचायत समित्याच्या निवडणुका ५ ते ३१ जानेवारी या वेळात होऊ शकतात.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *