Mumbra Fire : मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात आग; झगडे चाळीतील दाेन मुलांसह चाैघे जखमी

Mumbra Fire : मुंब्र्यातील शिवाजीनगर भागातील झगडे चाळीत लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. फायर ब्रिगेडचे पथक आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

ठाण्याजवळील मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या झगडे चाळीत आज आग लागल्याची घटना घडली. या चाळीतील आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.  पाण्याच्या फवा-याने आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

या चाळीतील दोन घरांना आगीच्या झळा बसल्या आहेत. सध्या चाळीतील घरांत माणसं थांबणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे. बहुतांश घरे रिकामी करण्यात आली आहेत. या आगीत एकूण 4 जण भाजले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या जखमींमध्ये एक पुरुष, एक महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. या चाळीच्या वरून जाणारी हाय टेन्शन वायर पडल्याने आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply