Mumbai Water Shortage: मुंबईकरांची चिंता वाढली; सातही धरणांमध्ये आता इतकाच पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Mumbai Water Shortage : पावसाळा सुरु झाला असला तरीही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने पाणीकपात करावी लागली आहे. नवी मुंबईमध्ये तर आठवड्यातून ३ दिवस सायंकाळी पाणीकपात करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना येत्या काळात पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

मुंबईतील धरणक्षेत्रात अपेक्षेपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे सातही धरणात एकूण ५.३१ टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस न पडल्याने मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागेल. गुरुवारी पहाटेपर्यंत धरणक्षेत्रात फक्त १६२ मीमी पावसाची नोंद झाली.

 

Buldhana : बुलढाण्यातील उत्खननात आधी पुरातन मंदिर आता विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती; लोकांमध्ये उत्सुकता वाढली

धरणातील पाणीसाठी कमी असल्याने महानगरपालिककेने ५ जूनपासून पाणीकपात लागू केली आहे. धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नाही आणि नागरिकांच्या पाण्याची चिंता मिटेल एवढा पाणीसाठा तयार होत नाही तोपर्यंत पाणीकपात कायम ठेवण्यात येईल.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत ऊर्ध्व वैतरणामध्ये १० मीमी पाऊस तर मोडकसागरमध्ये २३ मीमी पाऊस, तानसामध्ये ३८ मीमी, वैतरणामध्ये १८ मीमी, भातसामध्ये १० मीमी, विहारमध्ये १५ मीमी, तुळशीमध्ये ४९ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी या धरणांच्या परिसरात चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे मागील वर्षी पाणीटंचाईची समस्या तुलनेने कमी होते. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यानेच नागरिकांच्या पाण्याची चिंता मिटेल, असं सांगण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply