Mumbai : मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला भारताचे पहिले अर्थमंत्री सीडी देशमुख यांचं नाव द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mumbai Trans Harbour Link News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली. या घोषणेचे सर्वांनी स्वागत देखील केले.आता यानंतर नवी मुंबई आणि मुंबई यांना जोडणाऱ्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख (सीडी देशमुख) यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र मराठी एकीकरण समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल द्वारे केली आहे

राज्यात अनेक महत्वपूर्ण पायाभूत सुविधांची कामे होत आहेत आणि त्याला तितक्याच आदर्श व्यक्तिमत्वांची नावे देणे सुद्धा महत्वपूर्ण आहे. विकासकामांच्या निमित्ताने आपल्या आदर्शाचे सुद्धा स्मरण येणाऱ्या पिढ्यांना झाले पाहिजे, ही बाब सुद्धा तितकीच आवश्यक आहे आणि तीच या मागणीमागची भूमिका असल्याचे मराठी एकीकरण समितीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  

मुंबई कोस्टल मार्गाला स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचे आपण घोषित केले आहे, याचे आम्ही स्वागत करत आहोत. WPI Index : सर्वसामान्यांना मोठा दिलासा; WPI आधारित महागाई दर ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच शून्याच्या खाली

तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)भारताचे पहिले अर्थमंत्री महाराष्ट्राचा अभिमान चिंतामणराव देशमुख (सीडी देशमुख) यांचे नाव देण्यात यावे, असे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन सखाराम देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply